gharfodi, chori

क्राईम

गेवराईत घरफोडी

By Karyarambh Team

August 17, 2020

गेवराई, दि.17 : शहरातील ताकडगाव रोडवर असलेल्या महेश नगर भागात रविवारी दुपारी अज्ञात चोरट्यांनी घरी कोणी नसल्याचे पाहून घरफोडी करून साडेबारा हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास केले आहेत. दरम्यान या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेवराई शहरातील ताकडगाव रोडवर असलेल्या महेश नगर भागात ज्ञानेश्वर खाडे हे वास्तव्यास आहेत. रविवारी ते घर बंद करून सहपरिवार केकत पांगरी या आपल्या गावाकडे गेले होते. दरम्यान या संधीचा फायदा घेऊन रविवारी दुपारी अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी, कोंडा तोडून आत प्रवेश करून कपाटातील 12 हजार रुपयांचे सोन्या, चांदिचे दागिने व नगदी पाचशे रुपये असा 12 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. दुपारनंतर मुलगा घरी आल्यावर हा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एएसआय सुनील ऐटवार तपास करत आहेत.