contenment zone

परळीतील एक कॉलनी सील

बीड

बीड : शहरातील जगतकर कॉलनी, भीमनगर भागात राहणार एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. तो राहत असलेला भाग सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले आहेत.

  शहरातील जगतकर कॉलनी, भीमनगर येथे राहणार्‍या रुग्णास किडनीचा विकार असल्याने उपचारार्थ औरंगाबाद येथील एका रुग्णालयात नेण्यात आले होते. त्याठिकाणी सदरील रुग्णावर डायलिसिस करण्यात आलेले आहे. त्याची कोरोना चाचणी केल्यानंतर तो पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे राहत असलेला जगतकर कॉलनी, भीमनगर हा भाग  सील करण्यात येत आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिले आहेत.

Tagged