antigen test majalgaon

माजलगाव : अँटिजन टेस्टमध्ये 14 व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे माजलगाव

माजलगाव : शहरातील व्यापार्‍यांची अँटिजन तपासणी मंगळवारी सकाळी 10 वाजता सुरू करण्यात आली. शहरातील 6 तपासणी केंद्रात 12 वाजेपर्यंत 354 लोकांची तपासणी करण्यात आली असून यात 14 व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील व्यापार्‍यांची अँटिजन तपासणी करण्यात आली. शहरातील वैष्णवी मंगल कार्यालय, छत्रपती शिवाजी विद्यालय, सिद्धेश्वर विद्यालय, गणपती मंदिर, नवीन बस स्टँड परिसर, सोळंके महाविद्यालय या सहा केंद्रावर सकाळी दहा वाजता तपासणीला सुरुवात करण्यात आली. दरम्यान या तपासणीत दुपारी 12 वाजेपर्यंत 354 लोकांची तपासणी पूर्ण झाली असून यात 14 व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अनिल परदेशी यांनी सागितले.

Tagged