antigen test swab

आष्टी

आष्टी : 1.30 वाजेपर्यंत सात व्यापारी पॉझिटिव्ह

By Karyarambh Team

August 18, 2020

आष्टी : तालुक्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी येथील 3 तपासणी केंद्रावर दुपारी दीड वाजेपर्यंत 409 व्यापार्‍यांसह किरकोळ विके्रत्यांनी तपासणी केली असून त्यापैकी 7 जणांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष कोटुळे यांनी दिली आहे.

शहरातील कन्या शाळा, महात्मा गांधी शाळा व जिल्हा परिषद बॉईज शाळेत अँटिजन टेस्ट करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी शासकीय अधिकारी व कर्मचारी प्रत्येक बुथवर दक्षता घेत यंत्रणा राबवत आहेत. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबविण्यात येत आलेल्या अँटिजन टेस्टचा प्रारंभ सकाळी झाला व्यापार्‍यांचा प्रतिसाद मिळत आहे. नियोजित वेळेत व्यापारी बांधवांनी टेस्ट करण्यासाठी यावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.