परळी : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी परळी शहरात व्यापारी वर्गाच्या सुरू असलेल्या अँटिजेन टेस्ट केंद्रांना भेट देऊन माहिती घेतली. यावेळी दररोज ३००० टेस्ट पूर्ण होतील अशी दक्षता घेण्याच्या सूचना ना. मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच या टेस्टसाठी आरोग्य विभागाकडे मुबलक प्रमाणात किट्स उपलब्ध असून सरसकट व्यापाऱ्यांनी या टेस्ट करून घ्याव्यात असे आवाहन धनंजय मुंडे यांनी व्यापारी बांधवाना केले आहे.
यावेळी ना. मुंडे यांच्यासह न. प. चे गटनेते वाल्मिक कराड, बाजीराव धर्माधिकारी, चंदुलाला बियाणी, राजा खान, भाऊड्या कराड, बाळू लड्डा, रवी मुळे, विजय भोयटे, सुरेश टाक, नितीन कुलकर्णी, शंकर आडेपवार, अनंत इंगळे, परळीचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, तहसीलदार विपीन पाटील, न.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद मुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कुरमे, डॉ. मोरे, डॉ. चाटे, नायब तहसिलदार रुपनर, चेतन सौंदळे, संग्राम गित्ते, गिरीश भोसले, मोहन साखरे, भागवत गित्ते यांसह परळीतील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोनाची मास स्प्रेडिंग थांबवून जिल्ह्यात वाढत चाललेल्या साखळीला अंकुश लावण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यात व्यापारी व अन्य मास स्प्रेडिंग घटकांच्या अँटिजेन रॅपिड टेस्टिंग केल्या जात आहेत. परळी शहरातील चार केंद्रांवर या टेस्ट केल्या जात असून याठिकाणी व्यापारी वर्गाने उत्सुर्फतपणे टेस्टसाठी सहभाग घेतल्याचे दिसून येत आहे. या टेस्ट साठी जिल्हा आरोग्य विभागाला एक लाख किट्स उपलब्ध करून देण्यात आल्या असून परळी शहरात दररोज तीन हजार व्यापाऱ्यांच्या तपासण्या केल्या जाव्यात अशा सूचना यावेळी ना. मुंडे यांनी केल्या. अँटिजेन टेस्टिंगच्या माध्यमातून कोरोनाच्या मास स्प्रेडिंगला ब्रेक लागणार असुन यासाठी सरसकट व्यापारी बांधवांनी तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे यावेळी ना. मुंडे म्हणाले. ना. धनंजय मुंडे यांनी स्व. गोपीनाथ राव मुंडे नटराज रंगमंदिर, परळी बसस्थानक येथे सुरू असलेल्या केंद्रांवर भेटी दिल्या. दुपारपर्यंत ५०० हुन अधिक व्यापाऱ्यांची तपासणी पूर्ण झाली असून आतापर्यंत १६ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.