खेळ

पै. राहुल आवारे यांना अर्जुन पुरस्कार जाहीर

By Karyarambh Team

August 18, 2020

पाटोदा : येथील भूमिपुत्र, कॉमनवेल्थ गेम्समधून सुवर्णपदक विजेता, पैलवान राहुल आवारे यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या निवडीबद्दल तालुक्यातील अनेक गावात आनंद व्यक्त करण्यात आला आहे.

    माळेवाडी येथील व सध्या पाटोदा येथे वास्तव्यास असलेले पै.बाळासाहेब आवारे यांचे राहुल हे सुपुत्र आहेत. शहरात वडिलांच्या तालमीत कुस्तीचे धडे घेऊन पुणे येथे काका पवार यांच्या तालमीत कुस्तीला आकार देऊन अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदक विजेता ठरले. तर कॉमनवेल्थ गेम्सच्या कुस्ती स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. हा क्षण सुवर्णाक्षरात लिहला गेला आहे. भारतातून अर्जुन खेलरत्न पुरस्कारासाठी राहुल आवारे यांची निवड झाल्याचे वृत्त पाटोदा तालुक्यात येताच शहरात फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. बसस्थानक परिसरात, भगवानबाबा चौक, डॉ.आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडण्यात आले. तर चुंभळी फाटा येथिल राहुल आवारे यांच्या तालमीत ही आनंद व्यक्त केला. दरम्यान, राहुल आवारे यांची महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती झाली असून ते सध्या प्रशिक्षण पुर्ण करत आहेत.

राहुल आवारे हा प्रमाणिकपणे कुस्तीवर प्रेम करणारे आहेत. देशासाठी सुवर्णपदक विजेता ठरले. अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आणि आवारे परिवाराच्या आनंदात भर पडली. या पुरस्काराचे सर्व श्रेय कुस्तीवर राहुलवर प्रेम करणार्‍यांचे आहे.-गोकुळ आवारे, राहुल आवारे यांचे बंधू