बीड, दि.21 : जिल्ह्यातील पाच शहरात चार दिवसापासून सुरु असलेल्या व्यापार्यांच्या अॅन्टीजेन टेस्टमध्ये आज पुन्हा तीन शहरात 172 व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आज दिवसभरात 2148 टेस्ट करण्यात आल्या. मंगळवारी 212, बुधवारी 230, गुरुवारी 248 व्यापारी अंबाजोगाई, आष्टी, केज, माजलगाव, परळी या पाच शहरात पॉझिटिव्ह आढळून आले होते. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यापार्यांसह आता तीन दिवसातील पाचही शहरातील पॉझिटिव्ह व्यापार्यांची संख्या 862 झाली आहे. आज केवळ अंबाजोगाई, माजलगाव, परळीत अॅन्टीजेन टेस्ट घेण्यात आल्या होत्या.अंबाजोगाई, आष्टी, केज, माजलगाव, परळीत 18, 19 आणि 20 ऑगस्टपर्यंत व्यापारी व इतर सर्व व्यावसायिकांच्या अॅन्टीजेन टेस्ट करण्याचं नियोजन जिल्हा प्रशासनाकडून सुरु होते. परंतु आणखीही या टेस्ट सुरुच आहेत. त्यात 20 ऑगस्ट रोजी 5877 टेस्ट करण्यात आल्या. त्यात 248 जण पॉझिटिव्ह आढळून आले. 19 ऑगस्ट रोजी 6189 अॅन्टीजेन टेस्ट करण्यात आल्या असून त्यात 230 व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले. 18 ऑगस्ट रोजी 5769 जणांच्या टेस्ट करण्यात आल्या त्यात 212 जण पॉझिटिव्ह आढळून आले.
21ऑगस्टच्या दिवसातील अॅन्टीजेन तपासण्या आणि एकूण पॉझिटिव्हअंबाजोगाई- ——963 ——— 30आष्टी—————-000 ——— 00केज – —————000——— 00माजलगाव ———366———- 66परळी ————-819———– 76एकूण ————2148 ——— 172
20 ऑगस्टच्या दिवसातील अॅन्टीजेन तपासण्या आणि एकूण पॉझिटिव्हअंबाजोगाई- ——1683 ——- 38आष्टी—————-963 ——— 20केज – —————767——— 28माजलगाव ———425———- 62परळी ————-2029 ——– 100एकूण ————5877 ——— 248
दि. 19 ऑगस्ट रोजी शहरनिहाय केलेल्या अॅन्टीजेन तपासण्या आणि पॉझिटिव्हअंबाजोगाई- ——2091 ——- 46आष्टी—————-600 ——– 33केज – ————–607——— 17माजलगाव ———859——– 29परळी ————-2032 —— 105एकूण ————6189 ——- 230दि. 18 ऑगस्ट रोजी शहरनिहाय केलेल्या अॅन्टीजेन तपासण्या आणि पॉझिटिव्हअंबाजोगाई—–1696 ——— 37आष्टी—————630———-17केज—————-697———--20माजलगाव——-1425 ———-71परळी ————1321———- 67एकूण———— 5769———–212