corona

कोरोना अपडेट

बीड : दिवसभरात 233 पॉझिटिव्ह

By Karyarambh Team

August 21, 2020

अ‍ॅन्टीजेनमध्ये 172 तर स्वाराती लॅबकडून आलेल्या रिपोर्टमध्ये 61 रुग्ण निष्पन्न

बीड, दि.21 : स्वाराती लॅबकडून जिल्हा प्रशासनाला रिपोर्ट प्राप्त झाले असून त्यात 61 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सायंकाळी आलेल्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये 172 व्यापारी पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे आता जिल्ह्यात दिवसभरात 233 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.स्वाराती लॅबकडून आलेल्या रिपोर्टमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 12, बीड 26, धारूर 5, गेवराई 7, केज 4, परळी, पाटोदा, आष्टी प्रत्येकी 2 तर वडवणीत एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर अ‍ॅन्टीजेन टेस्ट घेण्याचा आजचा चौथा दिवस होता. त्यात माजलगाव, परळी, अंबाजोगाई या तीन शहरांमध्ये आज टेस्ट घेण्यात आल्या होत्या. त्यात माजलगावात 66, अंबाजोगाईत 30 तर परळीत 76 असे मिळून 172 रुग्ण आढळून आले आहेत.बीड कोरोना अपडेटएकूण रुग्ण- 3782कोरोना मुक्त 1876एकूण मृत्यू- 85उपचार सुरु- 1821जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त रिपोर्ट खालील प्रमाणे…

1
2
3
4