corona vaccine

कोरोना अपडेट

73 दिवसात लस! ते वृत्तच खोटं

By Karyarambh Team

August 23, 2020

सिरम इन्टिट्युटकडून स्पष्टीकरण

बीड, 23 : अवघ्या 73 दिवसात सिरम इन्स्टिट्यूट आपली लस बाजारात उपलब्ध करून देणार हे वृत्त धादांत खोटं आहे. माध्यमांनी त्यांच्या अंदाजाने हे वृत्त दिलेलं आहे. जेव्हा लस उपलब्ध करायची त्यावेळी सिरमकडून अधिकृतपणे सांगण्यात येईल, असे स्पष्टीकरण आज सिरम इन्स्टिट्यूटकडून देण्यात आलं आहे.

सिरमने म्हटले आहे की, ‘कोविशिल्ड’च्या उपलब्धतेविषयी माध्यमांमध्ये सध्या जे दावे केले जात आहेत, ते पुर्णपणे खोटे व अंदाजावर आधारित आहेत. सध्या केंद्र सरकारनं आम्हाला फक्त लस तयार करण्याची परवानगी आणि भविष्यातील वापरासाठी ती साठवून ठेवण्याची परवानगी दिली आहे. कोविशिल्डच्या सर्व चाचण्या एकदा यशस्वी झाल्या आणि आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर ही लस विक्रीसाठी उपलब्ध होईल. ऑक्सफोर्ड-अँस्ट्राजेनेका लसीची तिसर्‍या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. लस रोगप्रतिकारक आणि प्रभावी असल्याचं सिद्ध झाल्यानंतर सिरम इन्स्टिट्यूट त्यांच्या उपलब्धतेविषयी अधिकृतपणे माहिती देईल, असं सिरमनं म्हटले. त्यामुळे लस कधीपर्यंत उपलब्ध होईल याबाबत अजूनतरी कुठल्याही कंपनीने अधिकृतपणे सांगितलेलं नाही.