क्राईम

हनी ट्रॅपमधील आरोपी पोलीस नाईक बडतर्फ

By Shubham Khade

August 23, 2020

नेकनूर : हनी ट्रॅप प्रकरणी बीड तालुक्यातील नेकनूर पोलिसात दाखल गुन्ह्यात एक आरोपी पोलीस कर्मचारी आहे. त्याची खात्यांतर्गत चौकशी करून पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी त्यास तडकाफडकी बडतर्फ केले आहे. ही कारवाई (दि.23) रोजी केली.

कैलास गुजर असे त्या पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे. जबरदस्तीने महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडून अश्लील व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 15 लाख रुपयांची मागणी केल्याची घटना दि.25 जुलै रोजी आष्टी व नेकनूर (ता.बीड) ठाणे हद्दीत येथे घडली होती. याप्रकरणी नेकनुर पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक 156/20 कलम 384, 324, 323, 120 (ब) भा.द.वि. अन्वये गुन्ह्यातील आरोपी पोलीस नाईक कैलास माणिक गुजर याला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी भारतीय राज्यघटना 1950 अनुच्छेद 311 (2) (ब) नुसार ही कारवाई करण्यात आली. दाखल गुन्ह्यात पोलीस कर्मचार्‍याचा प्रत्यक्ष सहभाग आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.