chori, gharfodi

धारूर : कोरोनाग्रस्तांचा घरांना चोरट्यांनी केले लक्ष

कोरोना अपडेट धारूर न्यूज ऑफ द डे बीड

किल्ले धारूर / सचिन थोरात
आष्टी तालुक्यातील टाकळसिंगा येथील कोरोनाबाधितांचे घर फोडल्याची घटना ताजी असताना रात्री धारूर तालुक्यातील चिंचपूर येथेही चोरट्यानी कोरोनाबाधित आश्रमात प्रवेश करून चोरी केल्याची घटना घडली.
धारूर तालुक्यात मागील आठवड्यात चिंचपूर रोड लगत असलेल्या गीता धाम आश्रमात बारा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. याठिकाणी कोरोना ग्रस्तांचा आकडा एवढा मोठा असतानाही कोणतीही भीती न बाळगता चोरट्यांनी सोमवारी रात्री या ठिकाणी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला असल्याने शहरात याच आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
धारूर शहरापासून जवळच असलेल्या चिंचपूर रोडलगत कृष्ण मंदिर आणि गीता धाम आश्रम आहे. मागील आठवड्यात या ठिकाणी असलेल्या 13 साधका पैकी 12 साधकांना कोरोना झाल्याचे सिद्ध झाले आहे. परिसरात भीतीचे वातावरण असताना याच आश्रमामध्ये सोमवारी रात्री चोरट्यांनी धुडगूस घालत चोरी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच एकाच ठिकाणी कोरोनाग्रस्तांचा एवढा मोठा आकडा येऊनही चोरटे कोणतीही भीती न बाळगता या ठिकाणी चोरी करण्यास गेले यामुळे शहरात सर्वत्र चर्चेचा हाच विषय आहे. घटना घडलेली समजताच येथील पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

पोलिसांसमोर नवे आव्हान
कोरोनाग्रस्तांचा ठिकाणी दिवसा देखील सामान्य माणूस फिरत नाहीत. त्यामुळे चोरटे कोरोनाग्रस्तांचे घर हेरून चोरी करत असल्याचे दिसत आहे. येत्या काळात पोलिसांसमोर हे मोठं आव्हान असणार आहे.

Tagged