beed sfot

क्राईम

बीडमध्ये कोटींग दुकानात स्फोट; एक ठार

By Karyarambh Team

August 25, 2020

करपरा नदीजवळ गिराम नगर परिसरातील घटना

बीड, दि.25 : बीड शहरातील करपरा नदीजवळील अंबिका चौक परिसरातील गिराम नगर भागात एका पावडर कोटींगच्या वर्कशॉपमध्ये गॅसगळतीमुळे भिषण स्फोट झाला आहे. यात वर्कशॉमध्ये काम करणारा संतोष गिराम (वय 30 रा.गिराम नगर) हा ठार झाला आहे. तर अन्य तिघे गंभीर जखमी आहेत. त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.घटनास्थळी शिवाजीनगर पोलीसांनी धाव घेतली असून बॉम्ब शोधक, पथकही त्या ठिकाणी दाखल होत असल्याचे पथक प्रमुखांनी सांगितले. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार करपरा नदीजवळ खिडक्या आणि स्लाइडींगचे वर्कशॉप आहे. याच ठिकाणी पावडर कोटींगचा व्यवसाय चालतो. दुपारी साडेतीनच्या सुमारास गॅस गळती होऊन त्याचा स्फोट झाला. त्यात चौघेजण जखमी झाले होते. जखमींपैकी संतोष गिराम याचा मृत्यू झाला तर अन्य तिघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.आजुबाजुचा परिसर हादरलास्फोट झाला त्यावेळी आजुबाजुचा परिसरही हादरून गेला होता. त्यामुळे काय झाले हे पाहण्यासाठी घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.