budun mrutyu-panyat budun mrutyu

न्यूज ऑफ द डे

पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

By Karyarambh Team

August 25, 2020

echo adrotate_group(3);

वडवणी, दि.25 : तालुक्यातील बाहेगव्हण येथील गावात जवळील सार्वजनिक आडात पोहण्यासाठी गेलेल्या दोन 10 वर्षीय मुलांचो बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी एक वाजता बाहेगव्हण येथे घडली. सदरील मुलांचा मृतदेह बाहेर काढून उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून शाळकरी मुलांना मृत घोषित केले.बाहेगव्हाण येथे दुपारी एक वाजता लखन महादेव पोटभरे (वय 10 वर्षे) व रोहन रामेश्वर मस्के (वय 10 वर्षे) हे दुपारी गावाच्या अगदी जवळ असणार्‍या सार्वजनिक आडामध्ये पोहोण्यासाठी गेले असता त्यातील रोहन रामेश्वर मस्के याने पोहण्याकरता आडामध्ये उडी मारली पण त्याला पोहता येत नव्हते. तोही पाण्यात बुडू लागला. जवळच आडाच्या काटावर बसलेला लखन महादेव पोटभरे या मुलाने देखील त्याला वाचण्यासाठी उडी मारली. त्याला वाचवण्याच्या नादात दोघेही पाण्यात बुडाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आडाजवळ दुसरे काही मुले जवळ बंधार्‍यात पोहोत होते. त्यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या घरी जाऊन या घटनेची माहिती दिली. त्यावेळी आरडाओरडा झाल्यामुळे लोक आडाजवळ जमा झाले उड्या मारून त्यांचे मृतदेह बाहेर काढले व त्यांना तातडीने वडवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी तपासणी केली असता मृत घोषित करून शवविच्छेदन करण्यात आले. बाहेगव्हण येथे शोकाकूल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला. या दुर्दैवी घटनेने बाहेगव्हण येथे हळहळ व्यक्त केली आहे.echo adrotate_group(7);

आडाला संरक्षण कठडे करण्याची ग्रामस्थांची मागणीकोरमोनामुळे शाळा बंद असल्याने शाळकरी मुले गावालगतच असणार्‍या सार्वजनिक आडामध्ये पोहण्यासाठी जात आहेत. त्यामुळे अशा दुर्घटना घडत आहेत. त्यामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी गावालगत असणार्‍या आडाला ग्रामपंचायतच्या वतीने आडाला संरक्षण कठडेजाळी करण्यात यावी, अशी मागणी बाहेगव्हाण येथील ग्रामस्थांनी केली आहेecho adrotate_group(8); echo adrotate_group(10);echo adrotate_group(9);