ट्रकसह पन्नास लाखांचा गुटखा पकडला

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे

अंबाजोगाई शहर पोलीसांची कारवाई

बीड : एका ट्रकमध्ये गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती अंबाजोगाई शहर पोलीसाना मिळाली. गुरुवारी (दि.27) सकाळी शहरातील भगवान बाबा चौक परिसरामध्ये ही ट्रक थांबवली. यावेळी ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

      पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार एका ट्रकमध्ये (एमएच-04 जे.के.4782) गुटखा असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ गाडे यांना मिळाली. सदरील ट्रक अंबाजोगाई शहरातील भगवानबाबा चौक परिसरामध्ये थांबवून तपासणी करण्यात आली. यावेळी ट्रकमध्ये तीस लाख रुपयांचा गुटखा आढळून आला. चालकाला ताब्यात घेत ट्रकसह 50 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सिद्धार्थ गाडे व त्यांच्या टिमने केली. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात प्रक्रिया सुरु आहे.

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged