क्राईम

अर्धवट कुजलेले प्रेत आढळले

By Keshav Kadam

August 28, 2020

घटनास्थळी पोलीसांची धाव

 पाटोदा  :  अर्धवट कुजलेल्या अवस्थेत एक पुरुष जातीचे प्रेत पाटोदा तालुक्यातील चुंभळी फाटा येथे शुक्रवारी (दि.28) आढळून आले. यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली असून पुढील तपास सुरु आहे. 

      पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार चुंभळी फाटा परिसरामध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये पुरुष जातीचे अर्धवट कुजलेल्या अवस्थेत प्रेत आढळले. काही दिवसापुर्वी हा मृत्यू झालेला असून मृतदेह पुर्णपणे कुजलेला आहे. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात येत असून पाटोदा पोलीस पुढील तपास करत आहेत.