rummy, tirat, jugar

डोंगरकिन्हीत जुगार अड्ड्यावर छापा

क्राईम न्यूज ऑफ द डे पाटोदा

 आठ जुगार्‍यांवर गुन्हा दाखल

पाटोदा  : पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही बसस्थानकावर असलेल्या एका दुकानाच्या छतावर जुगार अड्डा सुरु होता. याची माहिती अंमळनेर पोलीसांना मिळाली. त्यांनी या ठिकाणी धाड टाकत जुगार्‍यांना ताब्यात घेतले. यामध्ये आठ जुगार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

      अंमळनेर पोलिस पोलीस ठाण्याच सपोनि. श्यामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. येथील बसस्थानकावरच हा जुगार अड्डा चालु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी महादेव गुणाजी चव्हाण, सुधीर भिमराव धनवे, रोहिदास रायते, बाबासाहेब धोंडिंबा गायकवाड, प्रभाकर बाबासाहेब येवले, अच्युत येवले, कैलास जिजाबा म्हस्के, लघु चांगदेव येवले या पत्ते खेळणारास पकडले. अंमळनेर पोलिसांनी भादवि कलम 12, 35 मुंबई जुगार कायद्याने गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक विजय लागारे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.श्यामकुमार डोंगरे, खोले, सचिन पवळ, काकडे, रवी आघाव वारे यांनी केली.

Tagged