Site icon कार्यारंभ लाईव्ह

गोदावरीत पाण्याचा विसर्ग करण्याची आशा मावळली

echo adrotate_group(3);

पैठण : येथील नाथसागर धरणाच्या जलसाठ्यात येणार्‍या पाण्याची आवक घटली आहे. समाधानकारक आवक नसल्यामुळे गोदावरी नदीमध्ये सोडण्यात येणार्‍या पाण्याची आशा मावळली आहे.echo adrotate_group(6);

नाथसागर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधान कारक पाऊस पडल्याने धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत होती. नाथसागरावरील भंडारदरा, दारणा, निळवंडे, ओझर (बंधारे), कश्यपी, गंगापूर या धरणातून पाण्याची कमीअधिक प्रमाणे पाण्याची नवीन आवक सुरू झाली. त्यामुळे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, प्रभारी अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, सहाय्यक अभियंता बुद्धभूषण दाभाडे, अभियंता राठोड, नगरपरिषद मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी तातडीने बैठक घेऊन नाथसागर धरणातून 85, टक्के पाणीसाठा झाल्यावर गोदावरी नदीत पाणी विसर्ग करण्यासाठी आराखडा तयार केला होता. मात्र शनिवारी येथील नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार माहितीनुसार नाथसागर जलाशयाची पाणीपातळी 1519,63 फुटामध्ये नोंद झाल्यामुळे आजच्या परिस्थितीत जवळपास 86,20 टक्के पाणीसाठा झाला आहे. सध्या पाण्याची आवक 8620 क्युसेक इतकी आहे. या धीम्यागतीने पाण्याची आवक सुरू राहिल्यास गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करणे अशक्य होणार आहे. जवळपास वरील धरणातून 30 हजार पाण्याची आवक मिळाल्यानंतरच गोदावरीत विसर्ग करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असे संकेत प्रभारी अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी ‘कार्यारंभ’शी बोलतांना दिले.echo adrotate_group(5); echo adrotate_group(1);echo adrotate_group(9);

Exit mobile version