क्राईम

नरेंद्र मोदी यांनी बीडचा श्वान रॉकीचे केले कौतूक

By Keshav Kadam

August 30, 2020

echo adrotate_group(3);

बीड  : बीडसह जिल्ह्याबाहेर जवळपास साडेतीनशे पेक्षाही जास्त गुन्ह्यांचा तपास लावणारा बीड पोलीस दलातील श्वान रॉकीला बीड पोलिसांनी सलामी दिली होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधतांना बीड पोलिस दलातील श्वान रॉकीचा उल्लेख केला.echo adrotate_group(6);

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ‘मन की बात’ मध्ये बोलतांना म्हटले की बीड पोलीस दलाने काही दिवसांपूर्वी टीव्हीवर आपण एक भावनिक दृश्य पाहिलं असेल, ज्यात बीड पोलिस दलाने श्वान रॉकीला सन्मानाने अंतिम निरोप दिला होता. रॉकीने 300 हून अधिक केसेसमध्ये पोलिसांना मदत केली होती यावेळी ते भावनिक झाले होते. त्यांनी बीड पोलीस अधीक्षक यांच्यासह सर्व पोलीसांचे कौतूक केले.echo adrotate_group(5);

मागच्या 8 वर्षापासून रॉकी बीड पोलिसांच्या मदतीसाठी काम करत होता, मात्र आजारपणामुळे त्याने 15 ऑगस्ट रोजी अखेरचा श्वास घेतला. रॉकीने 2016 साली कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये कांस्यपदक पटकावले होते. खून आणि दरोड्यासारख्या मोठ्या गुन्ह्याचा तपास रॉकीने लावला होता. त्याच्या निधनानंतर बीड शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसांनी रॉकीला मानवंदना वाहिली. अगदी कोरोनाच्या संकटकाळात सुद्धा सोशल डिस्टंसिंग कसे ठेवायचे याचे प्रशिक्षण रॉकीला देण्यात आले होते.echo adrotate_group(9); echo adrotate_group(1);