बीड : जिल्ह्यात आजच्या कोरोनाग्रस्तांचा तपशील रविवारी साडेदहाच्या सुमारास जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात शनिवारी 94 जण पॉझिटिव्ह आढळून आले. आज 667 अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यात एक अनिर्णीत आहे.
आज आढळून आलेल्यांमध्ये अंबाजोगाई 12, आष्टी 8, परळी 5, पाटोदा 1, वडवणी 4, धारूर 7, गेवराई 12, शिरूर 5, बीड 27, माजलगाव 11, केज 2 असे एकूण 94 रुग्ण आढळून आले आहेत.
बीड कोरोना अपडेट (30 ऑगस्ट) एकूण रुग्ण- 4561 कोरोना मुक्त 3248 एकूण मृत्यू- 121 उपचार सुरु- 1192