मुंबई, दि.31 : मुंबई बाजार समितीवर अशोक डक यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून अर्ज दाखल करण्याचा वेळ संपेपर्यत एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे आता केवळ त्यांच्या निवडीची औपचारिकता बाकी आहे. डक यांना पवारांकडून हे एक निष्ठेचे फळ ठरले आहे. तसेच पवारांचे होमपिच असलेली बारामती ही डक यांची सासरवाडी असल्याने सासरवाडीकडून अधिकमासाचे ‘धोंडे’ गिफ्ट असल्याची प्रतिक्रीया माजलगावकरांमधून व्यक्त होत आहे.40 वर्षापासून शरद पवार यांच्याशी जिल्ह्यातील ज्या काही एकनिष्ठ कुटूंबाची नावे समोर येतात. त्यात स्व.गोविंदराव डक यांचे अग्रगण्य नाव आहे. अशोक डक यांना मुंबईचे सभापतीपद मिळणार असे वृत्त दैनिक ‘कार्यारंभ’ने आज सकाळीच प्रकाशीत केले होते. या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे.आज दुपारी 1 वाजेपर्यंत सभापतीपदासाठी अर्ज दाखल करण्याचा वेळ होता. त्यात अशोक डक यांचा सभापतीपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड निश्चित झाली.उपसभापतीपदी धनंजय वाडकर
उपसभापतीपदासाठी काँग्रेसकडून धनंजय वाडकर यांना उमेदवारी देण्यात आली होती.. त्यांचीही निवड उपसभापतीपदासाठी झाली असून दोघांच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी आहे.