budun mrutyu-panyat budun mrutyu

क्राईम

शेततळ्यात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

By Karyarambh Team

August 31, 2020

पैठण तालुक्यातील घारी येथील घटना

पैठण  : शेततळ्यामध्ये बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना पैठण तालुक्यातील घारी येथे सोमवारी (दि.31) सायंकाळी घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.         पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पैठण तालुक्यातील घारी शिवारातील एका शेततळ्यामध्ये बुडून समीर हबीब पठाण (वय 14 रा.घारी ता.पैठण), महमद शाहेद शेख (वय 7 रा.नायगाव ता.जि.औरंगाबाद) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे, बीट जमादार शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह पाण्याच्या बाहेर काढत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सदरील शेततळे हे आमदार सतिष चव्हाण यांच्या शेतातील आहे.