न्यूज ऑफ द डे

दहा वर्षाच्या ओमला ट्रान्सप्लॉन्ट शस्त्रक्रियेसाठी मदतीची गरज

By Keshav Kadam

September 02, 2020

 बीड :  पोटातील लहान आतडी पूर्णत: खराब झाल्यामुळे ट्रान्सप्लान्ट या मोठ्या शस्त्रक्रियेसाठी मोठ्या रक्कमेची गरज आहे. दहा वर्षाच्या ओम संतोष घुले या बालकांच्या जीवन जगण्यासाठी दानशुर व्यक्तींनी मदत करावी असे अवाहन करण्यात येत आहे. 

      ओम संतोष घुले (वय 10) असे मुलाचे नाव आहे. त्याच्या पोटातील लहान आतडी खराब झाल्यामुळे पनवेल येथील साई चाईल्ड केअर सेंटरमध्ये दि.19 ऑगस्ट 2020 रोजी शस्त्रक्रिया करून आतडी काढून टाकण्यात आली आहेत. साई हॉस्पिटल पनवेल आणि ज्युपिटर हॉस्पिटल, ठाणे येथे आतापर्यंत तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तसेच आतापर्यंत 8 लक्ष रु खर्च झाला आहे. अजून 25 लक्ष रुपयांचा खर्च होणार आहे. ओमच्या जगण्याचा शेवटचा मार्ग म्हणून फक्त लहान आतडी 1 मीटर पर्यंत ट्रान्सप्लान्ट करूनच जोडण्यात येणार आहे. सदरील शस्त्रक्रिया पुणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये होणार आहे. सदर शस्त्रक्रियेसाठी 25 लक्ष रूपये खर्च येणार आहे. त्यामुळे मदत करण्याचे अवाहन करण्यात आले आहे.

अशी करु शकता मदतखातेदाराचे नाव- संतोष एम घुलेखाते क्रमांक -31438897058IFS Code: SBIN0007795शाखा- एमआयडीसी एआरए महाड, तालुका महाड,जि.रायगड किंवा तुम्ही 9766167397 या नंबर वर गूगल पे सुद्धा करू शकतात.दानशुर व्यक्ती, सेवाभावी संस्थेचे विश्वस्त यांनी डोनेशन देवून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दानशुर व्यक्तींनी मदत करण्याचे अवाहन