मुंबई, दि.4 : अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबई आणि मुंबई पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झालेला असतानाच आता मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील या प्रकरणात उडी घेत कंगणाला चांगलेच झापले आहे.धनंजय मुंडे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की याच मुंबईने तुमच्या सारख्या अनेकांना आसरा दिला आहे. ग्लॅमर-करिअर दिलंय. एखादी व्यक्ती इतकं कृतघ्न दोनच परिस्थितीत वागू शकते, एकतर ती संस्कारानेच कृतघ्न घडलेली असते किंवा तिचे मानसिक संतुलन ढासळलेले असते. धनंजय मुंडे यांच्या या टिकेनंतर आता कंगना काय प्रत्युत्तर देते हे पहावे लागेल.
काय म्हणाली होती कंगना‘संजय राऊत यांनी मला जाहीर धमकी दिली असून पुन्हा मुंबईत येऊ नकोस, असं धमकावलं आहे. मुंबईच्या रस्त्यांवर आजादी ग्रॅफिटी आणि आता ही जाहीर धमकी, मला मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे, असा सवाल कंगनानं तिच्या ट्विटमध्ये केला होता.