क्राईम

पीपीई किट घालून आहूजा मेडिकल फोडले

By Keshav Kadam

September 04, 2020

बीड शहरातील साठे चौकातील प्रकार सीसीटीव्हीत कैद

बीड :  शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातील आहुजा मेडिकल चोरट्यांनी फोडले. चोरटदुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरटयांनी गल्ल्यातील 60 हजारांची नगदी रक्कम लंपास केली. यावेळी चोरटयांनी पीपीई किट घातल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

     शहरातील साठे चौकातील आहुजा मेडिकल मध्ये रात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास एक चोरटा पीपीई किट घालून आला. दुकानाचे छोटे शटर टॉमबीने तोडून त्याने दुकानात प्रवेश केला. पीपीई किट, ग्लोव्हज, मास्क अशा वेशात आलेल्या या चोराने दुकानाच्या गल्यातील साठ हजारांची रोख रक्कम घेऊन पसार झाला. या प्रकरणी बीड शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.