gopinath munde devendra fadanvias

‘राज्याचे नेतृत्व फडणवीसांनी करावे ही गोपीनाथ मुंडेंची इच्छा होती’

राजकारण

बीड : स्व.गोपीनाथ मुंडे यांना राज्याचे नेतृत्व करण्याची इच्छा होती, परंतु मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले. त्यावेळी मी एका हेलिकॉप्टर प्रवासात राज्याचे नेतृत्व कोण करणार? असे विचारले होते, त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे बोट दाखविले होते, असे विधान विधान परिषदेचे आमदार तथा भाजपचे मुख्य प्रतोद आ.सुजितसिंह ठाकूर यांनी दिली.

वंजारी सेवा संघ महाराष्ट्र यांच्यावतीने लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित लोकनेता व्याख्यानमालेत ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल विरोधकांनी अनेकदा अफवा पसरवल्या. त्यांनी काही कारणावरुन राजीनामे दिले, त्या-त्यावेळी ते भाजप सोडतील असे सांगण्यात आले. आ.ठाकूर यांनी पुढे सांगितले की, मी परभणीला असताना मुंडे साहेबांचा फोन आला. मी उद्या औरंगाबादला येत आहे, तिथून मला भगवानगड, चौंडी आणि पुण्याला जायचे आहे. तेव्हा तु आणि देवेंद्र फडवणीस विमानतळावर या असे त्यांनी मला सांगितले. आम्ही तयार होऊन मुंडे साहेब यांच्यासोबत निघालो. यावेळी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी व देवेंद्र फडवणीस हे सोबत होते. त्यावेळी आता कोणाला घेऊ नका, तुमच्याशी बोलयचे आहे असे ते म्हणाले. प्रवास सुरु झाल्यानंतर मी त्यांना म्हटले, साहेब तुम्हाला वजनदार खातं मिळालं, पण मला माहितीय तुम्ही केंद्रात रमणार नाही, पण राज्याचं नेतृत्व कोण करले? त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतलं. आणि त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे पाच वर्षे यशस्वी नेतृत्व केलं, असंही आ.ठाकूर म्हणाले.