pankaja munde

न्यूज ऑफ द डे

ऊसतोडीच्या प्रश्नावर शरद पवारांशी चर्चा करणार – पंकजाताई मुंडे

By Karyarambh Team

September 07, 2020

बीड, दि.7 : ऊसतोड कामगारांनी संपाचं हत्यार उपसल्यानंतर माजी मंत्री तथा ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करून याविषयावर भाष्य केलं आहे.

पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘माझ्या ऊसतोड मजूर बांधवांच्या न्याय मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जेष्ठ नेते शरद पवार साहेब, कारखानदारांचे प्रतिनिधी जयंत पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी विश्वास ठेवावा. आपल्या कोयत्याला न्याय नक्कीच मिळेल. तथापि, कोयत्याची धार आणि सन्मान सांभाळण्याची जबाबदारी ऊसतोड कामगार आणि मुकादमांवर देत आहे,’ असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.