कोरोना अपडेट

अधिवेशनाला उपस्थित असलेला शिवसेना आमदार कोरोना पॉझिटीव्ह 

By Keshav Kadam

September 10, 2020

मुंबई : देशासह राज्यातही कोरोनाचा कहर कमी होताना दिसत नाही. शिवसेनेच्या एका आमदारालाही कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले. या अधिवेशनाला या आमदारांचीही उपस्थिती होती. त्यांचा कोरोना रिपोर्ट पोझिटीव्ह आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.      मिळालेल्या माहितीनुसार, शिवननेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. डॉ.किणीकर हे अंबरनाथ मतदारसंघाचे आमदार आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना मुंबईच्या रुग्णालयात उपचरार्थ दाखल करण्यात आलं असल्याची माहिती देण्यात आली आहे. सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. त्या अधिवेशनाला किणीकर उपस्थित होते. महत्वाचे म्हणजे या पावसाळी अधिवेशनात किणीकर यांची विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. दरम्यान सोमवार आणि मंगळवारी अधिवेशनाला उपस्थिती लावल्यानंतर त्यांना अंगदुखीचा त्रास जाणवू लागला. यावेळी केईएम रुग्णालयात कोरोना चाचणी केली असता रात्री त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यानंतर त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यासंबंधी त्यांनी स्वतः माहिती दिली आहे. त्यांची तब्येत स्थिर असून घाबरण्याचे कारण नाही. त्यामुळे मतदारसंघातील कोणीही काळजी करू नये. सर्व कार्यकर्त्यांनी आणि मतदारसंघातली सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन किणीकर यांनी केलं आहे.