क्राईम

40 कोटीच्या गुटखा प्रकरणात एफआयआर रद्द करण्याचे आदेश

By Keshav Kadam

September 11, 2020

प्रत्यक्षात गुटखा न सापडल्यानेऔरंगाबाद खंडपिठाने दिला निकाल

बीड  : येथील पेठबीड पोलीसांनी ठाणे हद्दीमध्ये एका गोदामावर छापा मारला होता. या ठिकाणी गुटखा आढळून आला नाही परंतु गुटख्याचे 40 कोटीचे कुपन आढळले होते. 40 कोटीची खरेदी-विक्री झाल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतू या गुटखा प्रकरणात दाखल गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने रद्द केला आहे.           पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तीन महिन्यापूर्वी म्हणजे एप्रिल महिन्यात एका भंगारच्या गोदामावर छापा टाकण्यात आला होता. या छाप्यात गुटख्याचे कुपन जप्त केले होते. त्या कुपनच्या आधारे पोलीसांनी तब्बल 40 कोटीच्या गुटख्याची खरेदी विक्री झाल्याचा ठपका ठेवत महेबुब खान या व्यापार्‍याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र या प्रकरणात पोलीसांना प्रत्यक्ष गुटखा सापडला नव्हता. पुढे यातील आरोपीला न्यायालयाने जामिन मंजूर केला होता. पेठबीड पोलीसांनी दाखल केलेल्या या गुन्हयाच्या विरोधात आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात धाव घेतली होती. त्यावर न्या. टी. व्ही. नलावडे यांच्यासमोर सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान प्रत्यक्ष गुटखा न सापडल्याचा मुद्दा बचाव पक्षाने लाऊन धरला. त्यानंतर सदर एफआयआर रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. बचाव पक्षाच्या वतिने अ‍ॅड.आदित्य सिकची यांनी बाजू मांडली. हा निकाल बीड पोलीसांसाठी एक धक्का मानला जात आहे.

या प्रकरणात मोठी उलाढाल 40 कोटी रुपयांची गुटख्याची कुपने छाप्यात आढळून आली. यावेळी स्थानिक पोलीसांसह वरिष्ठांनीही घटनास्थळी धाव घेतली होती. कुपन अनेकांच्या नावे होती. त्यांना चोकशीसाठी बोलावून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली असल्याचेही बोलले जात आहे.