आगे आगे मुंडे, पिछे पड गये गुंडे; तुकारात मुंडेंच्या समर्थनार्थ घोषणा

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

नागपूर : राजकीय नेत्याच्या स्वागताला किंवा निरोपाला गर्दी होणे स्वाभाविक आहे. पण शासकीय अधिकार्‍याच्या निरोपाला नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येत मोठी गर्दी करून त्यांना निरोप देणे, अशी घटना क्वचितच घडते. आज नागपुरात असे घडले. धडाकेबाज, कठोर, शिस्तप्रिय, कायद्यांचे काटेकोर पालन करणारे अधिकारी तुकाराम मुंडे यांनी महापालिका आयुक्तपदावरून करण्यात आल्यानंतर आज (दि.11) रोजी नागपूरचा निरोप घेतला. ते नागपूरहून मुंबईकडे रवाना झाले.

मुंडे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या. वुई वॉण्ट मुंढे साहेब… आगे आगे मुंढे, पीछे पड गये गुंडे… वंदे मातरम्… अशा घोषणा लोक देत होते. मुंढे हे तब्बल सात महिने नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळं नागपूरकरांची मने जिंकली होती. अलीकडेच त्यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर नियुक्ती झाली होती. अवघ्या 15 दिवसांत ती बदलीही रद्द झाली आहे. त्यांना कोणती नवी जबाबदारी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, नागपूरमधून त्यांनी आपला मुक्काम हलवला आहे. कोरोनाची लागण झालेल्या मुंढे हे नुकतेच या आजारातून बरे झाले आहेत. आज ते मुंबईकडे रवाना झाले. तत्पूर्वी, फेसबुक पोस्ट शेअर करून त्यांनी नागपूरकरांचे सहकार्याबद्दल आभार मानले. नागपूरकरांनी शासन, प्रशासनाला यापुढंही सहकार्य करावं. नागपूरकरांशी असलेले ऋणानुबंध कायम राहतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसंच, नागपुरातून निघण्यापूर्वी मुंढे यांनी काही नागरिकांच्या भेटीही घेतल्या. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्या विरोधात मुर्दाबाद, मुर्दाबाद अशा घोषणाही लोकांनी दिल्या.

Tagged