न्यूज ऑफ द डे

मराठा आरक्षणाचं विरोधकांना राजकारण करायचंय-शरद पवार

By Karyarambh Team

September 11, 2020

नवी दिल्ली : मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायलयाने स्थगीती दिली आहे. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, मराठा आरक्षणाचं विरोधकांना राजकारण करायचंय आणि आम्हाला मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे. मराठा आरक्षण स्थगितीवर अध्यादेश काढला जाऊ शकतो. तसंच सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली जाऊ शकते. कायदेशीर बाबी न्यायालयासमोर मांडण्यात येतील, असे पवार यांनी सांगितले. दरम्यान, मराठा आरक्षण स्थगीतीवर अध्यादेशाचा पर्याय आहे. तसेच, 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची मागणी गैर नाही, फेरविचार याचिका दाखल करण्यात येऊ शकते अशी माहिती खासदार शरद पवार यांनी दिली आहे.