न्यूज ऑफ द डे

यंदाचा धोंडे महिमा रद्द; पुरूषोत्तमपुरी ग्रामपंचायतचा ठराव

By Karyarambh Team

September 11, 2020

echo adrotate_group(3);

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्णय

 माजलगाव  :  तालुक्यातील पुरूषोत्तमपुरी येथे देशात एकमेव भगवान पुरूषोत्तमाचे मंदिर आहे. या ठिकाणी धोंड्याच्या महिण्यात महिनाभर यात्रा भरते. या दरम्यान देशभरातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. परंतू यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्थांसह ग्रामपंचायतने ठराव घेत यंदाचा धोंडे महिमा रद्दचा निर्णय घेतला आहे.       माजलगाव तालुक्यातील पुरूषोत्तमपुरी येथे अधिक मासारंभ म्हणजे धोंड्याचा महिना दि.18 सप्टेबर ते 16 ऑक्टोंबर दरम्याण पुरूषोत्तमपुरी देवस्थानाचे महत्म लक्षात घेता दर्शनासाठी राज्याभरासह देशभरातून भाविक येतात. मागील अधिक मासाचा अनुभव घेता. या ठिकाणी दररोज अंदाजे 60 ते 70 हजार भाविक दर्शनासाठी आले होते. परंतू सध्यस्थितीत जगभरासह देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभुमिवर ग्रामस्थांसह पुरूषोत्तमपुरी ग्रामपंचायतच्या वतीने यंदाचा धोंडे महिमा रद्दचा ठराव घेतला आहे. याबाबत प्रशासनास ही लेखी निवेदनाव्दारे पुरूषोत्तमपुरी ग्रामपंचायत व भगवान पुरूषोत्तम देवस्थान समितीच्या वतीने कळवले आहे.echo adrotate_group(6);echo adrotate_group(1);echo adrotate_group(5);