covid 19

कोरोना अपडेट

कोरोनामुक्त झालेल्यांसाठी आरोग्य मंत्रालयाच्या खास सुचना

By Karyarambh Team

September 13, 2020

मुंबई, दि.13 : कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांकडे आता आरोग्य मंत्रालयाने लक्ष केंद्रीत केले आहे. अशा व्यक्तीसाठी केंद्राने खास सुचना जारी केल्या आहेत. भारतात 37 लाख 2 हजार रुग्ण आजपर्यंत कोरोनामुक्त झालेले आहेत. या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त इतर आजार भेडसावत आहेत. ही बाब आरोग्य विभागाने गंभीरपणे घेतली आहे.

देशात करोनामुक्त होणार्‍याचं प्रमाण वाढत असले तरी अनेकांना आरोग्याच्या समस्या दिसत आहेत. अशक्तपणा किंवा शरिराचा एखादा भाग खराब होणं यासारख्या समस्या करोनामुक्त होणार्‍या बर्‍याच रुग्णांमध्ये दिसत आहेत. या समस्यांना समोर ठेवून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं करोनामुक्त झालेल्यांसाठी काही सुचना आणि उपाय सुचवले आहेत.कोरोना मुक्त झालेल्यांनी अशी घ्यावी काळजी