Site icon कार्यारंभ लाईव्ह

नियम पाळा, पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ देऊ नका- मुख्यमंत्री ठाकरे

echo adrotate_group(3);

मुंबई: सध्या महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती, निसर्ग चक्रीवादळ आहे. पण, याही परिस्थितीत सरकार खंबीर आहे. जागतिक संघटनेनं इशारा दिला आहे, कोरोनाची लाट येणार आहे. त्यामुळे सतर्क राहिले पाहिजे. नियम पाळा अन्यथा पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ शकते असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात येत्या १५ तारखेपासून मोहिम राबवतोय. या मोहिमेत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांनी जात धर्म हे सोडून सहभागी झाले पाहिजे. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम सुरू करत आहोत. कोरोना पासून सावध राहण्यासाठी नागरिकांना काही नियम पाळावेच लागतील. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावे लागणार आहे,घरी आल्यावर बुट बाहेर काढणे, हात-पाय धुणे, कपडे बाहेर काढून ठेवणे आणि त्यानंतर घरात प्रवेश करावा, समोरासमोर बोलण्याचे टाळा, मास्कचा वापर करा त्याचबरोबर मी घरीच बसून काम करतोय, असा आरोप होतोय. पण मी व्हिडिओच्या माध्यमातून खेड्यापाड्यात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलो आहे. त्या लोकांशी बोलणे गरजेच आहे. ते काम मी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करत आहे. आणि काम होत आहे. आरोप करून काहीही फायदा नाही.echo adrotate_group(7); echo adrotate_group(1);echo adrotate_group(8);

Exit mobile version