chori, gharfodi

कोरोना अपडेट

गढी येथील जयभवानी मंदिरातून देवीचे दागिणे चोरी

By Keshav Kadam

September 14, 2020

echo adrotate_group(3);

घटनास्थळी पोलीसांसह श्वान पथक दाखल

गेवराई  : तालुक्यातील गढी येथील जयभवानी मंदिरामध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत देवीच्या डोक्यावरील चांदीचा टोप, कमरपट्टा आणि गळ्यातील मणीमंगळसूत्र इत्यादी ऐवज अज्ञात चोरट्याने चोरी केला. ही घटना सोमवारी (दि.14) सकाळी पुजार्‍यांच्या निदर्शनास आल्यानंतर चोरीचा प्रकार दिसून आला. याची माहिती गेवराई पोलीसांना दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. चोरीच्या तपासासाठी श्वान पथक, एलसीबी, फिंगरप्रिट पथक दाखल झाले आहेत.          गेवराई तालुक्यातील गढी येथे जय भवानी मंदिर आहे. या मंदिरामध्ये रात्री कोणीही नव्हते. याच संधीचा फायदा उचलून अज्ञात चोरट्याने मंदिराच्या गेटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. मंदिरातील जयभवानी देवीच्या डोक्यावरील चांदीचा टोप, चांदीचा कमरपट्टा, सोन्याचे मणीमंगळसूत्र असा ऐवज चोरून नेला. सोमवारी सकाळी पुजार्यास चोरीचा प्रकार दिसून आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती गेवराई पोलीसांना दिली, त्यानुसार पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चोंभे, सपोनि.राजाराम तडवी, उबाळे यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. चोरीच्या तपासासाठी एलसीबी, श्वान पथक, फिंगरप्रिंट पथक दाखल झाले होते. या चोरीच्या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान मंदिरात दानपेटी होती, दानपेटी फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला मात्र त्यात अपयश आले. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी मंदिर परिसराची पाहणी केली.echo adrotate_group(6);echo adrotate_group(10);echo adrotate_group(5);