chori, gharfodi

क्राईम

अज्ञात चोरट्यांनी विजया बँक फोडली

By Karyarambh Team

September 15, 2020

धारुर तालुक्यातील तेलगाव येथील प्रकार

धारुर ः तालुक्यातील तेलगाव कारखाना परिसरात असलेली विजया बँक अज्ञात चोरट्यांनी सोमवारी (दि.14) मध्यरात्री फोडल्याची घटना घडली असून यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र सुदैवाने बँकेतील रोकड चोरी गेली नसल्याची माहिती पोलीसांनी दिली.         तेलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना परिसरात विजया बँक आहे. या बँकेच्या जवळच माँ वैष्णवीदेवी मंदिर आहे. या बँकेत तेलगाव कारखाना परिसर, तेलगाव, कारी आदी भागातील शेत उत्पादक शेतकर्‍यांसह अनेक व्यवसायिक व जनतेची खाती आहेत. सोमवारी रात्री या बँकेच्या भिंतीमधील खिडकीला लावलेली लोखंडी जाळी तोडून काचेची खिडकी फोडत अज्ञात चोरट्यांनी बँकेत चोरीचा प्रयत्न केल्याचे सकाळी निदर्शनास आले. यामुळे याभागात खळबळ माजली असुन दिंद्रुड पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. सुदैवाने बँकेतील काहीही चोरी गेले नसल्याची माहिती सपोनि.अनिल गव्हणकर यांनी दिली.