कोरोना अपडेट

महाराष्ट्र सदनात एकाच दिवशी 17 जण कोरोना पॉझिटिव्ह

By Karyarambh Team

September 17, 2020

दिल्ली : येथील महाराष्ट्र सदनात कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. एकाच दिवशी तब्बल 17 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त समोर आले आहे.

महाराष्ट्र सदनाच्या कॅन्टीनमधील सात जण पॉझिटिव्ह आले असून सफाई कर्मचारी आणि स्टाफलाही लागण झाल्याचे सांगण्यात आले आहे. अधिवेशनासाठी काही खासदारांचा मुक्काम महाराष्ट्र सदनात असतानाच कोरोनाचा उद्रेक झाल्याने खळबळ उडाली आहे.