nath sagar, jaykwadi prakalp

बीड

जायकवाडीतून 1 लाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग

By Karyarambh Team

September 17, 2020

echo adrotate_group(3);

पैठण, दि.18 : जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी घेतला आहे. त्यानुसार जायकवाडीतून गुुुरुवारी रात्री ते शुक्रवारी सकाळपर्यंत टप्प्याटप्प्याने 100000 लाख विसर्ग वाढविण्यात आला आहे अशी माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी दैनिक ‘कार्यारंभ’शी बोलताना दिली.गुरुवारी सायंकाळी धरणाचे 18 दरवाजे अर्धा फूट उघडण्यात आले होते. त्यामुळे गोदावरी नदीमध्ये 9432 क्येसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. त्यानंतर पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु झाल्याने आणि धरण यापुर्वीच 99.28 टक्के भरलेले असल्याने विसर्ग वाढविण्यात येणार आहे. धरणात सध्या 37 हजार 662 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरु आहे. 14 दिवसांपासून नाथसागरातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.त्यामुळे पैठण तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या वडवाळी, आपेगाव, नवगाव, हिरडपुरी, टाकळी अंबड, आवडे उंचेगाव यासह 14 गावांना पुन्हा एकदा महसूल प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी गोदावरी नदी पात्रात कोणीही जाऊनही असा इशारा दिला आहे. नाथसागरातून विसर्ग वाढविला जात असल्याने गेवराई, माजलगाव तालुक्यातील गोदाकाठच्या नागरिकांचा जीव टांगणीला लागलेला आहे.echo adrotate_group(7);

माजलगाव प्रकल्पातून पाण्याचा विसर्गमाजलगाव धरणातुनही पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सध्या धरणातून 2431 क्युसेक वेगाने सिंदफणा नदीपात्रात विसर्ग सुरु आहे. धरणाचे गेट क्र.11, 6 आणि 16 मधून हा विसर्ग करण्यात येत आहे. माजलगाव प्रकल्प 98.72 टक्के भरलेले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या पाऊस थांबलेला आहे.echo adrotate_group(5); echo adrotate_group(10);echo adrotate_group(9);