saandas chincholi

माजलगावातील सांडस चिंचोली, डेपेगावचा दळण-वळणाचा संपर्क तुटला

गेवराई न्यूज ऑफ द डे बीड माजलगाव

माजलगाव, राजापूर, दि.18 : माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली येथे सिंदफणा आणि गोदावरी नदीला आलेल्या पुराने गावचा संपर्क तुटला आहे. माजलगाव धरणातून सकाळी विसर्ग वाढविण्यात आला असून सध्या 42 हजार क्यसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. वरतून जायकवाडी प्रकल्पातून आज सकाळपासून 1 लाख क्यूसेक वेगाने विसर्ग सुुरु आहे. त्यामुळे मंजरथ आणि तेथून खाल्याच्या गावांना सुमारे दिड लाख क्यूसेकपेक्षाही जास्त वेगाने पाणी दाखल होण्याची शक्यता आहे.

गोदावरीनदी यापुर्वीच दुथडी भरून वहात होती. त्यात आता सिंदफणा नदीचे पाणी मिसळले आहे. गोदावरीचा पाण्याचा वेग वाढणार असल्याने सिंदफणा नदीकाठच्या गावांना पाण्याचा मोठा तुंब येऊ शकतो. त्यामुळे नागडगाव, रोषनपुरी, शिंपेटाकळी, मनुर गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. माजलगाव धरणाचे एकूण 11 दरवाज्यांवाटे पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
त्याचबरोबर जायकवाडी प्रकल्पातून गोदापात्रात एक लाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग आज सकाळपासून सुरु असल्याने हे पाणी येत्या 12 तासात गेवराई तालुक्यात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावळेश्वर, कटचिंचोली, मिरगाव, पांगुळगाव, राहेरी, भोगलगाव, गंगावाडी, राजापूर, काठोडा, मनुबाई जवळा आदी गावांना पुरपरिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.

गेवराई तालुक्यातील पांचाळेश्वरचे मंदिर पाण्याखाली….

गेवराई तालुक्यातील पांचाळेश्वरचे मंदिर पाण्याखाली….
माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले आहेत.
#jayakwadi_update, majalgaon_dharan_update
माजलगाव तालुक्यातील सांडसचिंचोली गावच्या पुलावरुन असे पाणी वहात आहे. त्यामुळे गावचा दळणवळणाचा संपर्क तुटला आहे.

Tagged