CORONA

ऊर्जामंत्री नितीन राऊत कोरोना पॉझिटीव्ह

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा राजकारण

मुंबई : राज्याचे ऊर्जामंत्री व काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनाही करोनाची लागण झाली आहे. राऊत यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. लोकप्रतिनिधी व मंत्र्यांमध्ये वाढत असलेला करोनाचा संसर्ग ही राज्य सरकारसाठीही चिंतेची बाब बनली आहे.
’माझा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी खबरदारी म्हणून स्वत:ची कोविड तपासणी करून घ्यावी,’ असं आवाहन त्यांनी केलं आहे. ’सर्वांनी काळजी घ्यावी आणि सुरक्षित राहावे,’ असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. करोनानंतरच्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील लोकप्रतिनिधी विविध कामांनिमित्तानं आपापल्या मतदारसंघामध्ये फिरत आहेत. बैठका व अन्य जबाबदार्‍यांमुळं त्यांचा अधिकारी, पोलीस व कार्यकर्त्यांशी सातत्यानं संपर्क येत आहे. त्यातून लोकप्रतिनिधींना करोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे. राज्यातील अनेक मंत्र्यांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, अस्लम शेख यांनाही करोनाची बाधा झाली होती. या सर्वांनी करोनावर मात केली आहे.

Tagged