pankaja munde

पंकजा मुंडेंनी प्रतिनिधीत्व कोणाचे करायचे ते ठरवावे? ‘या’ महिला नेत्याचे आव्हान

न्यूज ऑफ द डे बीड

बीड : साखर संघाच्या बैठकीत पंकजा मुंडे या साखर कारखानादारांसमवेत बसल्याचा मुद्दा उपस्थित करुन ऊसतोड मजूर आणि साखर कारखानदार या दोन्ही भूमिका एकाच वेळी घेता येणार नाहीत. कोणाचे प्रतिनिधीत्व करायचे हे ठरवा असे स्पष्ट आवाहन प्रा.सुशिला मोराळे यांनी केले. तर बैठकीत पंकजा मुंडे यांनी पाच वर्षापूर्वी करात करताना आपण लहान होतोत, अनुभव नव्हता अशी कबुली देत ऊसतोड मजुरांच्या दरवाढीचा करार हा तीनच वर्षाचा असला पाहिजे अशी बैठकीत भूमिका घेतली.

भाजप सरकारच्या काळातच ऊसतोडणी मजूर दरवाढीचा करार तीन वर्षांवरुन पाच वर्षाचा केला आणि पाच टक्के अंतरिम दरवाढ ही प्रत्यक्षात दिली नाही. त्यामुळे कारखानदारांनी सहा वर्ष ऊसतोडणार्यांच्या तोंडाला पाने पुसली. लवादाची मुदत संपली असल्याने आता सरकार, साखर संघ आणि ऊसतोडणी मजूर, मुकादमांच्या संघटना असा त्रिपक्षीय सामंजस्य करार केला तरच ऊसतोड मजुरांना न्याय मिळेल. महागाई वाढीच्या तुलनेत दरवाढीचा करार तीनच वर्षाचाच असला पाहिजे अशी स्पष्ट भूमिका ऊसतोडणी कामगार वाहतुक मुकादम संघर्ष समितीच्या समन्वयक प्रा.सुशिला मोराळे यांनी मांडली. या बैठकीला केशव आंधळे, मोहन जाधव, प्रा.सुभाष जाधव, गहीनीनाथ थोरवे, प्रदीप भांगे, दादासाहेब मुंडे, जीवन राठोड, श्रीमंत जायभाय, दत्तोबा भांगे, विष्णूपंत जायभाय उपस्थित होते.

Tagged