न्यूज ऑफ द डे

राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत निवडणुकीची चाचपणी

By Karyarambh Team

September 18, 2020

echo adrotate_group(3);

जिल्हाधिकार्‍यांकडून मागवला अहवाल

  मुंबई  : कोरोना महामारीमुळे निवडणुका न घेता ज्या ग्रामपंचायतच्या मुदती संपल्या आहेत. त्या ग्रामपंचायतवर प्रशासन नेमले आहे. निवडणूका कधी होणार याकडे सर्व भावी सरपंचाचे लक्ष लागलेले आहे. त्यातच राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूकीची चाचपणी सुरु केली असून जिल्हाधिकारी यांच्याकडून अहवाल मागवले आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत निवडणुकीची चाचपणी सुरू केली आहे. ग्रामपंचायत निवडणुका घेता येतील का याबाबत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकार्‍यांकडून अहवाल मागवला आहे. 21 सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एप्रिल ते जून 2020 कालावधीत मुदत संपणार्‍या आणि नव्याने स्थापित होणार्‍या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाबाबत राज्य निवडणूक आयोगाने पत्र दिले आहे.echo adrotate_group(7);

echo adrotate_group(5); echo adrotate_group(1);echo adrotate_group(9);