अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
बीड : 18 बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत गुटखा पकडण्यात आला होता. शुक्रवारी (दि.18) दुपारी न्यायालयाच्या आदेशाने अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने हा गुटखा जाळण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने 15 एप्रिल रोजी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मांजरसुंबा येथे 24 लाख 15 हजार रुपयांचा गुटखा पकडला होता. तसेच एक टेम्पो (केए-32 डी-4494) हा जप्त केला होता. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी ऋषिकेश मरेवार यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील गुटखा न्यायालयाच्या आदेशाने हा गुटखा नष्ट करण्यात आला. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी, अन्न सुरक्षा अधिकारी ऋषिकेश मरेवार, अनिकेत भिसे यांच्यासह बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि.सुजित बडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.