Site icon कार्यारंभ लाईव्ह

माजलगाव येथे कोरोनाग्रस्ताचा मृतदेह 10 तास एकाच ठिकाणी

echo adrotate_group(3);

न.प.कडून मृतदेहाची हेळसांड, कारवाई करणार-प्रतिभा गोरे
माजलगाव : शहरातील कोविड रूग्णालयात दि.18 रोजी रात्री 10 वाजता कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. याबाबत सर्व विभागांना माहिती कळवूनही प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्याने तब्बल 10 तास मृतदेह एकाच जागेवर पडून होता. त्यामुळे नातेवाईकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पालिकेचे मुख्याधिकारी यांचा मोबाईल स्विच ऑफ होता. या प्रकारामुळे माजलगाव नगरपरिषदेची असंवेदनशीलता समोर आली असून पालिकेची लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत. कर्तव्यात कसूर करणार्‍या बेजबाबदार अधिकार्‍यांना संबंधित प्रकरणाचा जाब विचारणार असल्याची माहिती तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी दिली.echo adrotate_group(6);

तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली मृत्युचे प्रमाण देखील वाढले आहे. शहारातील कोविड रुग्णालयात रात्री एकाचा मृत्यू झाल्यानंतर रुगणालय प्रशासन व नातेवाईकांनी आरोग्य, महसूल, नगरपालिका प्रशासनाला मृत्युबाबत माहिती दिली होती. मृतदेह तात्काळ हलवणे नगरपालिकेचे काम असताना व त्यांच्या संबंधित विभागाच्या कर्मचार्‍यांना वारंवार सांगुनही ते रात्री न आल्याने ही मृतदेह सकाळी 8 वाजेपर्यंत रूग्णालयात पडून होता. याबाबत मयताच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला असून पालिकेतील दोषी कर्मचार्‍यांविरोधात कारवाई करण्याची मागणी मागणी केली केली आहे. दरम्यान, यापूर्वी देखील असे प्रकार घडले असून न.प.प्रशासनाकडून याची साधी दखलही घेण्यात आलेली नाही.echo adrotate_group(5); echo adrotate_group(10);echo adrotate_group(9);

Exit mobile version