majalgaon dharan

न्यूज ऑफ द डे

माजलगाव धरणातून पुन्हा मोठा विसर्ग

By Karyarambh Team

September 19, 2020

माजलगाव, दि.19 : माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु झालेला असल्याने धरणातून 42 हजार 765 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे.शिरूर, वडवणी आणि बीड या भागात पडणार्‍या पावसाचे पाणी सिंदफणा, बिंदुसरा आणि कुंडलिका नदी या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येतात. या नदीचे पाणी माजलगाव धरणात येते. आज सकाळपासून पाणलोट क्षेत्रात कुठे न कुठे पाऊस सुरु आहे. त्यामुळे धरणात सायंकाळी 7 वाजता 27 हजार 643 क्युसेक वेगाने पाणी दाखल होत होते. सायंकाळी 8 वाजता 42 हजारावर पाण्याची आवक पोहोचली. त्यामुळे तितकाच विसर्ग सिंदफणा पात्रात सोडण्यात आला आहे. सध्या माजलगाव धरण 98.46 टक्के भरलेले आहे. पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.जायकवाडीतून 47 हजार विसर्गजायकवाडी (नाथसागर) प्रकल्पातून 47 हजार क्युसेकने विसर्ग सुरु आहे. कालच जायकवाडीचा विसर्ग 92 हजारांपर्यंत ठेवण्यात आला होता. सध्या या धरणात 47 हजार 260 क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे. धरण 97.25 टक्के भरलेले आहे.