केज : तालुक्यातील वरपगाव येथील भूमिपुत्र दिग्विजय राजकुमार देशमुखची इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्स संघासाठी निवड झाली आहे. दिग्विजयचे वडील राजकुमार भागवत देशमुख हे 80 च्या दशकातील केज तालुक्यातील क्रिकेटमधील एक वेगवान गोलंदाज व अष्टपैलू खेळाडू म्हणून परिचित होते. राज्य रणजी किंवा देशाच्या क्रिकेट टीममध्ये खेळण्याचे स्वप्न होते. परंतु त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. पुढे ते बारामती येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. शालेय वयापासूनच त्यांनी दिग्विजयला क्रिकेटची आवड निर्माण करून प्रशिक्षण दिले. दिग्विजयच्या मेहनतीला फळ मिळाले असून त्याची मुंबई इंडियन्स संघात खेळाडू म्हणून निवड झाली आहे. त्याच्या निवडीबद्दल शिवसंग्रामचे केज तालुकाध्यक्ष बाळासाहेब गलांडे यांच्यासह तालुकावासियांनी अभिनंदन केले आहे.