jyotsna kailas tayade

न्यूज ऑफ द डे

प्रॅक्टीस करणार्‍या नर्सिंगच्या विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या

By Karyarambh Team

September 20, 2020

परळी : परळी शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये प्रॅक्टिस करण्यार्‍या नर्सिंगच्या विद्यार्थीनीने आपल्या गावी जाऊन आत्महत्या केली.जोत्सना कैलास तायडे (वय 21 काकनवाडा ता.संग्रामपूर जि.बुलढाणा) असे युवतीचे नाव आहे. ती परळी येथील एका खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करत होती. कोरानामुळे ती गावी गेली होती. यावेळी तिच्या शिक्षणासाठी वडीलांनी मोठ्या प्रमाणात कर्ज काढल्याचे तिला समजले. तिने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.