कोरोना अपडेट

जिल्ह्यात आणखी 1060 बेड उपलब्ध

By Karyarambh Team

September 20, 2020

echo adrotate_group(3);

बीड जिल्हा वासीयांनो घाबरू नका, काळजी घ्या – ना.धनंजय मुंडे

बीड : जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे कोविड विषयक सर्व सुविधा आणि उपाय योजनांचा दररोज आढावा घेत आहेत. जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये उपलब्ध बेडची संख्या मुबलक असून नागरिकांनी याबाबत घाबरायची गरज नाही असे ना.मुंडे यांनी म्हटले आहे.       जिल्ह्यात ऑक्सिजनची सुविधा असलेले एकूण 770 बेड तर व्हेंटिलेटर्सची सुविधा असलेले एकूण 124 बेड उपलब्ध आहेत. त्याचबरोबर 166 सामान्य बेड उपलब्ध आहेत. जिल्हा आरोग्य विभागाला याबाबतची सर्व माहिती दररोज नागरिकांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात यावी याबाबत सूचनाही ना. मुंडेंनी दिलेल्या आहेत. त्यानुसार आरोग्य विभागाकडून दररोज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या आकडेवारी सोबतच आता दररोज कोरोना मुक्त होणार्‍यांची संख्या, तसेच रुग्णालय निहाय उपलब्ध असलेल्या बेडची संख्या ’डॅशबोर्ड’ स्वरूपात दररोज प्रसिद्धीला देण्यात येत आहे. दरम्यान ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानास जिल्ह्यात सुरूवात होत असून नागरिकांनी रुग्णालयातील उपलब्ध बेडच्या संख्येवरून गोंधळून जाऊ नये, जिल्ह्यातील आरोग्ययंत्रणा सक्षमपणे काम करत असून, बेडसह अन्य सर्व सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, तसेच आपण त्यावर बारकाईने लक्ष ठेऊन आहोत. पुढील काही दिवसात रुग्ण संख्या आणखी वाढल्यास शहरननिहाय आणखी खाजगी दवाखान्यांना कोविड रुग्णालयात रूपांतरित करण्यात येईल, त्याबाबतची तयारीही पूर्ण केलेली आहे, असेही ना. धनंजय मुंडे म्हणाले.echo adrotate_group(7);echo adrotate_group(10);echo adrotate_group(8);