देश विदेश

अखेर शैक्षणिक वर्ष, नियमात बदल

By Karyarambh Team

September 22, 2020

नवी दिल्ली : कोरोनाचा सर्वाधिक फटका शैक्षणिक क्षेत्राला बसला आहे. या पार्श्वभूमीवर आधी परिक्षा होणार की नाही? यावरून संभ्रम होता. तो प्रश्न सुटताच नवे शैक्षणिक वर्षे कसे असणार? हा सर्वांना पडलेला प्रश्न होता. पण, परीक्षेनंतर आता नवीन शैक्षणिक वर्ष कसे सुरु करावे याबाबत युजीसीच्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

युजीसीने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार, नव्या शैक्षणिक वर्षात अखेर बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, 1 नोव्हेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरु करण्याची महत्वपूर्ण सूचना करण्यात आली आहे. यात सुट्ट्यांचा कालावधी कमी करावा. तसेच, आठवड्याचे 6 दिवस काम करावे या सूचना आहे. त्याचबरोबर, लॉकडाऊनमुळे प्रवेश रद्द किंवा स्थलांतरित करावे लागल्यास पूर्ण फी परत करावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या 1 नोव्हेंबरपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरु होणार असून शाळा, महाविद्यालयांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या दक्षतेसाठी पुर्वतयारी करावी लागणार आहे.