Site icon कार्यारंभ लाईव्ह

‘राजा’बाबूऽऽऽ; गुन्हेगारांवर नाही पोलीसांचा काबू!!

r raja
echo adrotate_group(3);

माजलगावात गुंडांकडून ठाण्यात घुसून तलवारबाजी
बीडमध्ये पोलीस चौकीसमोरील दुकाने फोडली

बीड। केशव कदम 
दि.22 : नुतन पोलीस अधीक्षक राजा रामस्वामी यांनी जिल्ह्यात पाऊल ठेवताच त्यांना पोलीसांकडून कडक सॅल्यूट ठोकण्यात आला. इतका कडक सॅल्यूट मिळताच राजा यांनी सलामी देणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांना रिवॉर्ड घोषीत केला. पण आता पोलीसांबरोबरच चोरट्यांनी देखील राजा यांना तसाच कडक सॅल्यूट मारला आहे. मागील दोन दिवसात जिल्ह्यात अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत. तर बीड शहरात ऐन पोलीस चौकीसमोरील चार दुकाने ओळीने फोडली आहेत. याशिवाय माजलगाव ग्रामीण ठाण्यात घुसून गुंडानी तलवारबाजी करीत एका सहायक पोलीस निरीक्षकाला जखमी केले. पोलीस अधीक्षक राजाबाबू यांना मिळालेल्या या सलामींनी जिल्ह्यातील कायदा सु-व्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत.echo adrotate_group(7);

चक्क पोलीस ठाण्यातच
तक्रारदारावर तलवारीने हल्ला!
माजलगाव- दि.22 ः माजलगाव ग्रामीण ठाण्यात तक्रार देण्यास आलेल्या तक्रारदारावर ठाण्यातच तलवारीने हल्ला करण्यात आला. या घटनेमध्ये एक सहायक पोलीस निरीक्षक जखमी झाला आहे. या घटनेने माजलगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.
     घटनेची अधिक माहिती अशी की, संतोष ज्ञानबा गायकवाड, सोनाजी उत्तम गायकवाड व आकाश बबन जाधव यांनी सात-आठ लोकांना सोबत घेऊन योगेश ज्ञानदेव गायकवाड या युवकाला हॉटेलवर जेवणाचे दोन हजार रुपये तू का मागितले म्हणून चिंचगव्हाण येथील त्याच्या घरी जाऊन मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि.21) रोजी रात्री साडेआठ वाजता घडली. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास योगेश गायकवाड याने संतोष उत्तम गायकवाड याचे घर गाठून तेथे त्यास शिवीगाळ केली. घटनेनंतर संतोष गायकवाड हा माजलगाव ग्रामीण ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला. त्यावेळी योगेश गायकवाडने आपला मित्र वैभव व्यवहारेकडून तलवार घेत पोलीस ठाण्यातच संतोष गायकवाडवर जीवघेणा हल्ला केला. यावेळी योगेश यानेही आपल्याकडील चाकू काढून प्रतिहल्ला केला. यावेळी मध्यस्थी करणारे सहायक पोलीस निरीक्षक राठोड जखमी झाले आहेत. या गुंडांनी ठाण्यात इतका धुडगूस घातला की, ठाणे अंमलदारांच्या केबिनची देखील नासधूस झाली आहे. दरम्यान पोलिसांनी योगेश ज्ञानदेव गायकवाड याच्या फिर्यादीवरून संतोष गायकवाड, सोनाजी उत्तम गायकवाड, आकाश बबन जाधव व इतर पाच ते सहा जणाविरोधात आर्मएक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. तर संतोष उत्तम गायकवाड याच्या फिर्यादीवरून योगेश गायकवाड, वैभव व्यवहारे यांचे विरुद्ध भादंवि 307 (34) आर्म अ‍ॅक्ट 353 नुसार गुन्हे दाखल केले आहेत. परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले झाल्यानंतर दोन हल्लेखोर तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान इतर फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. जखमी युवकावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.नीता गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक विजय थोटे हे करत आहेत.echo adrotate_group(8);

पोलीस चौकीसमोरची
दुकाने चोरट्यांनी फोडली
बीड- बीड शहरातील बार्शीनाका येथील पोलीस चौकीसमोरील चार दुकाने अज्ञात चोरट्यांनी सोमवारी (दि.21) रात्री फोडली. पोलीस चौकीच्या समोरच चोरांना भीती नसेल तर इतरत्र काय अवस्था असेल हे वेगळं सांगायची गरजच नाही.
बार्शी नाका येथील एका मोबाईल शॉपीसह हॉटेल, पान सेंटर आणि ट्रेडर्समध्ये चोरी करून चोरट्यांनी जवळपास 30 ते 40 हजार रूपयांची रक्कम आणि साहित्य लंपास केले. हॉटेल जायखामधील गल्ल्यातील 3 हजार रुपये, उमर पान सेंटरमधून 1 मोबाईल, जी.एन.हार्डवेअरमधून काही सामान, दोस्ती मोबाईल शॉपीमधून लॅपटॉप व इतर साहित्य चोरी केले आहे. त्यामुळे पोलीसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.echo adrotate_group(9);

‘राजा’बाबू बीडमध्ये आल्यानंतर घडलेल्या काही ठळक घटना
– धारूरमध्ये मुख्य रस्त्यावरील पंचमुखी गणेश मंदिर फोडून पुजार्‍याचेही घर फोडले.
– आष्टी शहरातील संभाजीनगर येथे राहणारे कंडक्टर संदीप जायभाये यांचे घर चोरट्यांनी फोडले. यात सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.
– बीड तालुक्यातील किन्हीपाई येथे सोमवारी (दि.21) घरफोडीची घटना घडली. रामप्रसाद धोंडीबा ढोबळे यांच्या घरातून चोरट्यांनी सोन्याचांदीच्या दागिण्यासह पावने तीन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय इतरही छोट्या-मोठ्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत.

सत्कारात दंग राहीले तर चोरटे देखील सत्कार करून जातील
बीडमध्ये हवसे-गवसे-नवश्यांना काही कमी नाही. कुठलाही अधिकारी आला की त्यांचा सत्कार करण्याची चढाओढ लागलेली असते. सत्कार करणार्‍यात कुणीच समाजसेवक नसतो (काही अपवाद असुही शकतात) प्रत्येकाला संबंधीत अधिकार्‍याकडून दोन नंबरच्या धंद्यात काही मदत पाहीजे असते. त्यामुळे ‘राजा’बाबू यांनी अशा लोकांपासून सावध रहायला हवे. अन्यथा सत्कारासाठी अपॉईंटमेंट मिळवून देणारे मधले दलाल चोरट्यांना घेऊनही तुमचा सत्कार करायला मागे-पुढे पाहणार नाहीत. त्यासाठी सावध व्हा, अशी विनंती सामान्य नागरिक करीत आहेत.

https://www.karyarambh.com/

echo adrotate_group(1);

Exit mobile version