बीड : जिल्ह्यात आज 194 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 8 हजार 999 इतकी झाली आहे.
जिल्हा प्रशासनाला गुरुवारी एकूण 994 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 800 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालामध्ये अंबाजोगाई तालुक्यात 27, आष्टी 26, बीड 37, धारूर 9, गेवराई 13, केज 15, माजलगाव 9, परळी 31, पाटोदा 10, शिरुर 8, वडवणी 9 असे एकूण 194 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 8 हजार 999 इतकी झाली आहे.
कोरोना अपडेटएकूण रुग्ण 8999मृत्यू 256बरे झालेले 5959उपचार सुरु 2784प्रशासनाचा अहवाल खालीलप्रमाणे